स्फुट
अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा।
तिथे जन्मला तो गुणातीत एका ।
जयाचेनि नामे चुके जन्म वेथा ।
नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ॥१॥
नदी दिव्य गोदा तटीचा निवासी ।
सदाप्रीय जो सज्जना वैष्णवासी ।
जया वर्णिता प्रेम आह्आद चित्ता ।
नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ॥२॥
स्वये भानुजो भानु आराधियला ।
तयाचे कुळी दिपकू दिव्य झाला ।
हरिभक्ती लावोनि तारी समस्त ।
नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ॥३॥