"शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन" ही संत एकनाथ महाराजांस समर्पित अशी सामाजिक सेवाभावी संस्था असून नाथांचा प्रचार प्रसार करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नाथांची अधिकृत माहिती विश्वातील वाचकांना, अभ्यासकांना, भाविकांना व्हावी या उद्देशाने www.santeknath.org या संकेतस्थळाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणक तज्ञ पद्मश्री डॉ. श्री विजय भटकर यांच्या हस्ते दि १३/१/२०१२ रोजी श्री एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण येथे करण्यात आले.
संकेतस्थळाची मूळ संकल्पना मिशनचे संस्थापन अध्यक्ष ह.भ.प. श्री. योगीराज महाराज गोसावी व श्री. मकरंद शहापूरकर यांची असून Xposure Infotech नाशिकच्या श्री. प्रसाद धर्माधिकारी व सौ. पल्लवी धर्माधिकारी यांनी संकेत स्थळाचे तांत्रिक नियोजन सेवाभावी वृत्तीने केले व करीत आहेत.सदरीय संकेत स्थळामध्ये संत एकनाथांच्या अनेकविध पैलूवर प्रकाश टाकला असून नाथांवर पी.एच.डी. करणा-या संशोधकांना अभ्यासाची साधनं कळावीत यासाठी येथे नाथांवरील अनेक पुस्तकांची विषयावर यादी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाथांची गुरुपरंपरा, वंशपरंपरा, शिष्यपरंपरा, आदींचा समावेश आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात नाथांच्या चरित्रासह त्यांचे निवडक वाङ्मय (अभंग, भारुड, गौळणी, ओव्या), नाथांवर लिहिल्या गेलेले काव्य इ. चा प्रकर्षाने अंतर्भाव करण्यात आला आहे.
या संकेत स्थळाचे लवकरच इंग्रजी, तेलगू, कानडी, गुजराती इ. भाषेत भाषांतर करण्यात येणार असून नाथांचे वाङ्मय फ्रि डाऊनलोड करता येणार आहे.
संकेत स्थळाच्या बांधणीपासून ते उद्घाटनापर्यत अनेकांचे सहकार्य लाभले. परिमल फोटोजचे श्री नंदकिशोर साळ्जोशी यांनी पैठण आणि परिसराची छायाचित्रे उपलब्ध करुन दिली. श्री एकनाथ अपरंपार यांनीही जुनी छायाचित्रे दिली. नाथांच्या माहितीसाठी श्री वेणीमाधव ऊर्फ सरदार महाराज गोसावी (नाथवंशज) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे श्री वैभव शहा(पुणे), श्री राजेंद्र तोरडमल(कर्जत), श्री श्रीकृष्ण बराटे(पुणे), श्रीहरिपंडीत गोसावी(पैठण), श्री पुष्कर गोसावी, सौ जागृती जहागीरदार, सौ अदिती गोसावी, कु.प्रियंका, कु.प्रांजली, श्रेयस, ज्ञानराज, चैतन्य गोसावी, श्रीनंदकिशोर नजन, श्री गौरव अपंरपार, श्री गणेश शेडगे, श्री बाळासाहेब भालेकर, श्री श्रेयस कुलकर्णी, श्री रविंद्र डांगे, श्री उमाकांत बजाज, श्री देवेंद्र शिंदे, आदींचे सहकार्य लाभले. मिशन या सर्वांचे आभारी आहे.
श्री. एकनाथ महाराजांच्या प्रसार प्रचार हेतू इतरांनाही संकेत स्थळास भेट देण्यास आवर्जुन सांगावे ही विनंती.