विश्वाच्या कल्याणार्थ सतत प्रयत्नशील असलेल्या संतांचे कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या आचार विचारातून समाज मन घडविले. अज्ञजनांना सन्मार्गाला लावले, अंधश्रध्देचा तिरस्कार करुन डोळस भक्ती करण्यास सांगितले. संपूर्ण विश्व हे एका परमेश्वराचेच अंश असून त्यात स्त्री पुरुष उंच नीच असा भेद नाही असा संदेश दिला. "शांतीचेनि सवे धरी वेगे सोय" असा शांतीमंत्र दिला, असे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज हे एक युगपुरूष होय. त्यांनी दिलेला विचार, त्यांनी अनुसरलेला आचार हा आपल्यासमोर आदर्श जीवनाचा वस्तुपाठच आहे. या गोष्टींचा फायदा बहुजनांस व्हावा या दृष्टीने त्याचा प्रसार प्रचार आवश्यक आहे.खरेतर ते आपणा सर्वांचे नैतिक कर्तव्यच आहे. सत्कार्यासाठी उचललेलं पाऊल हे व्यर्थ पळण्याच्या खटाटोपापेक्षा कितीतरी चांगलं असतं. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनने अशाच प्रकारचे पाऊल उचलले असून ती पाऊले अशीच पुढे पडत रहावी यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
आपण खालील प्रकारे मदत करु शकता-१) आर्थिक देणगीच्या स्वरुपात.
२) गरजेच्या वस्तुच्या स्वरुपात.
३) संत एकनाथांच्या ग्रंथांची जुनी हस्तलिखिते देवून.
४) या कार्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊन.
टीप - वरील कोणत्याही मदतीसाठी खालील पत्त्यावर, दुरध्वनीवर संपर्क साधा.
संपर्कसाठी पत्ता:
शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जि. औरंगाबाद.
पीन - ४३१००६
इ मेल आयडी - info@santeknath.org
भ्रमणध्वनी - ९४२१४१११३५