शांतिब्रह्म श्रीसंतएकनाथमहाराजांच्या सामाजिक तथा आध्यात्मिक कार्याने प्रेरित होऊन दि. १०/३/२००६ (फा.शु. ११ शके १९२८) रोजी श्रीनाथसमाधी मंदिर पैठण येथे "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन" ची स्थापना करण्यात आली. नाथांचे १३ वे वंशज ह.भ.प. श्रीवेणीमाधव उर्फ श्रीसरदारमहाराज गोसावी यांच्या शुभहस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. "अनाथांचा नाथ श्रीएकनाथ" असे मिशनचे ब्रीदवाक्य आहे.
१) श्रीएकनाथमहाराजांचा शांती व समतेचा संदेश सर्वत्र पोचविणे.
२) श्रीएकनाथमहाराजांच्या कार्याचा तथा वाङमयाचा प्रसार प्रचार करणे.
३) अनेक सामाजिक तथा आध्यात्मिक उपक्रम राबविणे.
नियोजित कार्ये :-१) विश्वशांती पीठ
२) संस्कार केंद्रे
३) अन्नसत्र
४) मोफत आरोग्यसेवा
५) वाङमय प्रकाशन
६) शिबिरे इ. इ.
मिशनगीत:-या जगासी तारण्या हा प्रकटला कुळदीपक ।
अर्पितो तुज सकळ जीवन नाथप्रभू मी अखंडित ॥१॥
चरणरज लागे जया ती पवित्रभूमी आम्हां परम ।
पवन पावन करितसे स्पर्शी तनुसी जी स्वयं ॥२॥
त्रिभूवनी झंकार गाजवू आदरे जय एकनाथ ।
सिद्ध करण्या कार्य आपुले द्यावे बळ म्हणे योगीनाथ ॥३॥
ज्यासी श्रीनाथाचे प्रेम । ज्यासी श्रीनाथाचा दर्शन नेम ।
श्रीनाथचि ज्याचे कर्म । ते ते परमपूज्य आम्हां ॥
यादृष्टीने मिशनची वाटचाल असून अनेक सामाजिक उपक्रमांद्वारा नाथांचा संदेश सर्वत्र पोचविण्याचा मिशनचा मानस आहे. ज्यांना अशाप्रकारचे कार्य करण्यात आवड व श्रद्धा आहे त्यांनी मिशनशी अवश्य संपर्क साधावा असे आवाहन या मिशनचे संस्थापक अध्यक्ष व नाथांचे १४ वे वंशज ह.भ.प. श्री. योगीराज महाराज गोसावी यांनी केले आहे.