हे एकनाथ महाराजांचे जलसमाधी स्थान आहे. कृष्णकमलातीर्थावर
नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या
पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी तुळस आणि पिंपळाची
रोपं उगवली. तेथेच नाथांचे पुत्र हरिपंडीत महाराजांच्या
हस्ते पादुकांची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीतील
मंदिराचा लाकडी गाभारा हा एकनाथांचे ११ वे वंशज
श्रीमंतराजे श्री भानुदास महाराज गोसावी, जहागिरदार
यांनी बांधला असून मुख्य तटबंदी ही अहिल्याबाई
होळकरांनी बांधली आहे. |