अभ्यासक्रमाविषयी Back to Login
अभ्यासक्रमाविषयी - "ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हा वारकरी संतांच्या उपकारक अशा वाङ्मयाचे अध्ययन घडविणारा तीन वर्षांचा एक स्वयंपूर्ण अभ्यासक्रम आहे. 'शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन, पैठण' या संस्थेने मोठ्या परिश्रमाने सकल संतांच्या जगदोध्दारक विचारांच्या पेरणीसाठी हा अभ्यासक्रम बनविला असून गेल्या काही वर्षांपासून हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांची माहिती, वाङ्मय हे अभ्यासार्थ उपलब्ध करून देण्याचा यात कसोशीने प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व कीर्तनकार व कीर्तनकार होऊ इच्छिणार्यांना हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम स्वान्त:सुखाय बनविण्यात आला असल्याने यातून मिळणारे समाधान हेच याचे एकमेव फळ आहे अशी आमची धारणा आहे. वारकरी सांप्रदायिक, अशाप्रकारचा हा अभिनव उपक्रम आमच्या संस्थेने सर्वप्रथम समाज माध्यमांसमोर आणला आहे, हा उपक्रम कार्यान्वित झाला असुन, हभप निलेश महाराज पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य, जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष यांचे सहकार्यातून, प्रमाणपत्र देण्यात येते.
परीक्षेचे स्वरूप - हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असुन एका वर्षात परीक्षेची तीन सत्रे असतात. कोणतीही सुजाण व्यक्ति या परीक्षेला बसण्यास पात्र असेल. तसेच प्रतिवर्षी उत्तीर्ण होणार्यांना प्रमाणपत्र देण्यातही येते.अर्थात या प्रमाणपत्राचा उपयोग कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी होणार नाही.
परीक्षेचे वेळापत्रक - तिन्ही वर्षांसाठी
१) सत्र क्रमांक १,४,७ ची परीक्षा ही प्रतिवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.
२) सत्र क्रमांक २,५,८ ची परीक्षा ही प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.
३) सत्र क्रमांक ३,६,९ ची परीक्षा ही प्रतिवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.
(परीक्षेचा निकाल हा परीक्षा झाल्यानंतर लगेचच उपलब्ध होईल.)
परीक्षेसंबंधी माहिती -
१) परीक्षा देण्यासाठी कोणत्याही केंद्रावर जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल, लैपटॉप, कम्प्युटरवर इंटरनेटच्या मदतीने आपण ती देऊ शकता.
२) परीक्षेसाठी लिंक - http://santeknath.org/eknath/index.php/userslogin/login या लिंकवर क्लिक करून आपला 'युनिक आयडी' व 'पासवर्ड' टाकायचा आहे.
३) लॉगिन झाल्यानंतर परीक्षा विभागात जाऊन "परीक्षेसाठी येथे क्लिक करा" या बटनावर क्लिक करा. पुढे आपल्याला प्रश्न व त्याची चार पर्यायी उत्तरे दिसतील. त्यातील योग्य त्या उत्तरावर क्लिक करून पुढच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर "सबमीट" या बटनावर क्लिक करा कारण त्यानंतरच आपली उत्तर पत्रिका आमच्या पर्यंत पोचू शकणार आहे.
४) सत्र क्रमांक १,२,४,५,७,८ यासाठी परीक्षेत ३० प्रश्न असतील तर सत्र क्रमांक ३,६,९ यासाठी ४० प्रश्न असतील. बरोबर उत्तरास प्रत्येकी १ गुण देण्यात येतो. (यात Nigative Marking System नाही याची नोंद घ्यावी)
५) तिन्ही परीक्षेच्या गुणांची सरासरी काढून वर्षाअखेरीस मुख्य गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्यात येते.
६) या शिवाय प्रत्येक सत्राची गुणपत्रिका ( Soft Copy ) निकालाच्या दिवशी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता व सोशल मीडियावर शेअरही करू शकता.
७) निकालाच्या दिवशीच पुढील सत्राचा अभ्यासक्रम वेबसाइटवर/ ए्प्लीकेशनवर उपलब्ध करून देण्यात येईल. तो अभ्यासक्रम डाउनलोड करून त्याचा अभ्यास करायचा आहे कारण यावरच परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतात. (अभ्यासक्रमाची PDF प्रत कोणासही पाठविण्यात येत नाही याची कृपया नोंद घ्या)
८) परीक्षेचे वेळापत्रक हे कायम वरील प्रमाणेच राहणार असल्याने परीक्षेच्या वेळापत्रकाची वेगळी माहिती देण्यात येत नाही. तरीही त्यात काही बदल होणार असल्यास त्यासंबंधी SMS किंवा इमेल आपणांस पाठविण्यात येईल.
९) आपण सोशल मीडियाचा वापर करीत असाल तर फेसबुकवर आपल्या पुढील पेजवर परीक्षेसंबंधी माहिती देण्यात येते त्याकडेही लक्ष ठेवावे ही विनंती.फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/OnlineVarkariSampradayAbhyaskram/
१०) एखाद्या सत्राची परीक्षा देता न आल्यास वर्ष वाया जाऊ शकते त्यामुळे आपली परीक्षा चुकू नये याची काळजी प्रत्येकाने घावी.
११) काही अपरिहार्य कारणाने एखाद्या सत्राची परीक्षा देता येत नसेल तर अशा परिस्थितीत आपण त्या सत्राची परीक्षा पुढील वर्षी देऊ शकता.(पुढील वर्षी त्याच वर्षाची फीस भरण्याची आवश्यकता नाही.)
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 8805010791 / 9960355522
About Syllabus- Back to Login
The "Online Warkari Sampradaya Curriculum Examination" is a three-year self-contained conducive course to study the benefactor literature of Warakari saints. The course is designed by 'Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan' with great diligence to sow the thoughts of all saints that will save the world. And from last few years thousands of students have been benefitted from it. The efforts have been made to make available the information and literature of all saints of the Warkari sect for study. This course will be very useful to all Kirtankars and also to those who want to become Kirtankars. Since this course has been developed for Swant:sukhaya (self-satisfaction), we believe that the only result of this is the satisfaction that will come through this. This is the first time that the organization has brought such an initiative through the social media and it is worth mentioning that this is the only online platform for the study of Warkari sect. This programme is designed through the vision of H.B. P. Shri Yogiraj Maharaj Paithankar, the fourteenth descendant of Shri Saint Ekanth Maharaj, (President and Head of the Mission) and run by H.B.P. Balasaheb Khahrmale Maharaj (Chairperson), H.B.P. Shekarmaharaj Jambhulkar (Co-Chairperson), H.B.P. Miss. Jayutai Patil (Secretary), the Executive Board Members and the co-ordinators of all districts and Talukas.
The Nature of the examination: This course is of three years duration and consists of three examination sessions in each year. Any person with basic knowledge of Warkari cult is qualified to appear for this exam. Certificates will be issued to all those who pass every year. Of course, this certificate will not be used for admission in any educational institution.
Time-table of examination (For all three years): -
01. The examination for Session No. 1,4,7 is on the second Sunday of April.
02. The examination for Session No. 2,5,8 is on the second Sunday of August .
03. The examination for session number 3, 6 and 9 is on the second Sunday of December.
(The exam results will be made available immediately after the exam.)
Information about the exam: -
1. There is no need to go to any centre to appear for the exam. You may give it on your mobile, laptop, computer with the help of internet.
2. Link for the examination: http://santeknath.org/eknath/index.php/userslogin/login- Click on this link to enter your 'unique ID' and 'password'
3. After logging in, go to the exam section and click on "Click here for exam" button. Next you will see the question and its four alternative answers. To answer the question click on the correct answer and go to next question. After answering all the questions, click on the "Submit" button. Then only your answer sheet will reach us.
4. There will be 30 questions for the exam of the session number 1,4,7, 2,5,8; and there will be 40 questions for the exam of the session number 3,6,9. The correct answer will be given 1 mark each. (Note that there is no Negative Marking System)
5. The main marks / certificates will be issued at the end of the year by averaging the marks of all the three examinations.
6. In addition, the soft copy of each session will be made available to you on the day of the result. You can download it and share it on social media.
7. The syllabus of the next session will be made available on the website on the second day of the result. You may download the syllabus and study because questions in the examination will be based on this. (Please note that PDF copy of the course will not be forwarded to anyone).
8. The schedule of the examination will always be the same as above, no separate information will be given for this. However, if there are any changes, it will be informed through the sms or email.
9. If you are using social media, please keep checking the information about the exam on the page on Facebook page link - https://www.facebook.com/OnlineVarkariSampradayAbhyaskram/
10. If you don't appear for a session exam, you have to wait till the next year, so everyone is requested to take care not to miss the exam.
11. If, for some unavoidable reason, you cannot appear for the examination of a session, in that case you may appear for the examination of that session next year. (There is no need to pay fees next year.)
For more information contact: 8805010791 / 9960355522
Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Rights Reserved.