Login Here

शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन पैठण

संचलित

" नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना व अभ्यासक्रमाची माहिती "

प्रवेश प्रक्रिया

1. 'अकाउंट बनवा' येथे क्लिक करून आपली संपूर्ण खरी माहिती संबंधित रकाण्यात लिहा.

2. 'Submit' बटणावर क्लिक केल्यानंतर आपली माहिती आमच्याकडे जमा होईल..

3. आता आपल्याला बैंकेत जाऊन अथवा ऑनलाईन (NEFT) च्या माध्यमातून फी भरायची आहे.

फी संबंधि अधिक माहिती - वर्ष १ - २०० रुपये , वर्ष २ - ३०० रुपये , वर्ष ३ - ४०० रुपये = ९०० रुपये (एकाच वेळी फी भरल्यास तिन्ही वर्षांची फी रुपये ७०० ही असेल याची नोंद घ्यावी.)

सर्व परीक्षार्थीनी बँकेमध्ये जाऊन अथवा NEFT च्या माध्यमातून खालील अकाउंटवर आपली फी जमाकरावी.

यानावाने : शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशन In the Name -  ShantibramhaShriEknathMaharaj Mission
बँकेचेनाव: स्टेटबँकऑफइंडिया, Name of Bank - State Bank of India
शाखा: भाजीमार्केट, पैठण Branch – Bhaji Market, Paithan
करंट अकाउंट क्रमांक: 00000036694177969 Current Account No - 00000036694177969
आय एफ एससी (IFSC Code): SBIN०००३७९६ IFSC Code - SBIN0003796
ब्रांच कोड:३७९६ Branch Code - 3796

4. पैसे भरल्याचा संदर्भ क्रमांक, आपले नाव, गाव, वर्ष व फी ची रक्कम आदी माहिती 7972625954 या मोबाईल क्रमांकावर TEXT SMS करून पाठवावी.

5. पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर आपल्याला त्यासंबंधीचा SMS पाठविण्यात येईल.

6. आता आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून आपण परीक्षेला बसण्यास पात्र झाला आहात.

7. वेबसाईटवर दिलेल्या PDF मधील प्रथमसत्र अभ्यासक्रम डाउनलोड करा. त्यावरच प्रथम सत्राची परीक्षा घेण्यात येईल. आपणास वेळोवेळी त्या त्या परीक्षेचा अभ्यासक्रम वेबसाईटवर किमान १ महिना आधी उपलब्ध करून देण्यात येईल.

8. परीक्षेची तारीख आपणास SMS / Email द्वारा कळविण्यात येईल. अथवा आपल्या अकाउंटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

9. आपले फेसबुक पेज https://www.facebook.com/OnlineVarkariSampradayAbhyaskram/ या वरही त्याची माहिती वेळोवेळी देण्यात येत असते.

अभ्यासक्रमाविषयी - हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असुन एका वर्षात तीन परीक्षा घेण्यात येतात. परीक्षा देण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर इंटरनेटच्या मदतीने आपण ती बसल्या जागेवर देऊ शकता. प्रतिवर्षी उत्तीर्ण होणार्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. कोणतीही सुजाण व्यक्ति या परीक्षेला बसण्यास पात्र असेल. अभ्यासक्रम, परीक्षा व निकाल या तीनही गोष्टी आपणांस वेबसाईटवरच उपलब्ध असतील. या उपक्रमात आपल्याला वारकरी संप्रदाय व त्याचे तत्वज्ञान याची उपयुक्त अशी माहिती मिळू शकेल. कीर्तनकारांना व कीर्तनकार होऊ इच्छिणार्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो कारण यात संप्रदायाच्या जवळपास सर्वच संतांच्या वाङ्मयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम स्वान्त:सुखाय बनविण्यात आला असल्याने यातून मिळणारे समाधान हेच याचे एकमेव फळ आहे अशी आमची धारणा आहे. अवघ्या तीनच वर्षात हा अभ्यासक्रम हजारो लोकांसहित अनेक देशापर्यंत पोचला आहे. संतवाङ्मयाचा प्रसार प्रचार सर्वस्तरावर व्हावा या साठी आपणासहित आपल्या सर्व परिवाराला या उपक्रमात सहभागी करून आत्मिक समाधानाचे भागीदार व्हावे. राम कृष्ण हरी !

अधिक माहितीसाठी संपर्क करा - 8805010791 / 9960355522