Marathi / English

॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥

  • मुख्यपान(current)
  • चरिञ
    • पुर्वेतिहास
    • जीवनगाथा
    • कार्य
    • चमत्कार
  • वाङ्‍मय
    • नाथांचे वाङ्‍मय
      • वाङ्‍मयाविषयी
      • निवडक वाङ्‍मय
    • नाथांवरील वाङ्‍मय
      • अभंग
      • कविता
      • स्फुट
  • तत्वज्ञान
    • नाथांचे तत्वज्ञान
    • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
    • पी.एच.डी. धारक
  • गॅलरी
    • फोटो
      • एकनाथमहाराज
      • उत्सव
      • पैठण
      • कार्यक्रम
    • व्हिडीओ
    • संगीत
  • शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन
  • संपर्क
  • पुर्वेतिहास
  • उत्सव
    • श्री एकनाथषष्ठी
    • पालखी सोहळा
    • उत्सव वेळापञक
  • मंदिर
    • गावातील नाथमंदिर
    • समाधी मंदिर
    • नित्योपचार
  • परंपरा
    • गुरुपरंपरा
    • वंशपरंपरा
    • शिष्यपरंपरा
  • चमत्कार
  • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
  • पुस्तके
  • कविता
  • पैठण
  • संकेतस्थळाविषयी
  • आवाहन
  • कसे याल
  • प्रतिक्रिया
  • संकेतस्थळाचा नकाशा
  • चरित्र चित्रावली
वारकरी संप्रदाय - माहितीपट

मिश्र

श्री कॄष्णदयार्णवकॄत श्री एकनाथ स्तोत्र

सप्रेमयुक्‍त घडली गुरुभक्‍तिसाची ।
झाली कॄपा सफल साध्य जनार्दनाची ।
बह्मैव बोध समता निजनिर्विकारी ।
श्रीएकनाथ विबुधा भरणावतारी ॥१॥

टीका भागवती यदीय धरिली डोक्यावरी पंडिती ।
भक्‍तीने वश तो भरीव सदनी पाणी सखा श्रीपती ।
श्री ज्ञानेश जणू पुन्हा क्षितीतली आले जनोध्दारणी ।
त्या श्री सद्‍गुरु एकनाथ चरणी मी येत लोटांगणी ॥
नमिला शमिलास्यप्रद शांती जलधि एकनाथ तो भावे ।
शोभावे ज्यांचे यश, चित्ती त्या देववृंद लोभावे ॥
संकलन वा. ना. उत्पात श्री. ऋक्मिणीपांडुरंग नित्य उपासना

ध्यायेनित्यं गुरुमूर्ती एकनाथ जनार्दनम् ।
भागवत धर्मप्रिय देवं शांतिब्रह्मं नमाम्यहम् ।
कृष्णभक्‍ति प्रियं भक्‍तं सगुणभक्‍ति प्रचारकम् ।
दत्‍तात्रेय वरासीतं तं वन्दे सूर्यनन्दनम् ॥
युगप्रवर्तक संत एकनाथ पृ.क्र. ११०

श्रीमद्‍ विठ्ठल भक्‍तिकारणकुळी तो भानुदास स्वये ।
ज्याचा आत्मज चक्रपाणी भजने तारी जडां निश्चये ।
झाला त्यासि सुपुत्र सूर्य मन हे तत्पार्दकंजी रमो ।
त्यापासूनि जगद्‍गुरू प्रकटला त्या एकनाथा नमो ॥
प्रस्ता.श्री ए. भा. गजानन म. संस्थान शेगांव.

मोरोपंत

भूत दया संसारी एकोपंतास निरुपमा घडली ।
जडली अंगासीच शांती सदा शांती तो गळा पडली ॥
एकोबाची सेवा आवडली फार केशवा देवा ।
रोमांचित तनु झाल्या गंगा कॄष्णा कलिंदजा रेवा ।
श्री ज्ञानेश्वर भेटे एकोबाला तसाचि अत्रिजा गा ।
हे किती दास्य करी प्रभू ज्याहुनी आधार अन्य न त्रिजगा ॥
ग्रंथ श्रीभागवत श्रीनारायण करि सुविस्तर ते ।
जरी न रचिता दयानिधि केलळ जड जीव ते कसे तरते ॥
जा पैठणांत षष्ठी तो संसारी कधी नव्हे कष्टी ।
हे स्वस्थाना नेते रक्षुनि अंधा बळे जशी यष्टी ॥
भक्‍तासी नाथ जैसा विश्वाचा मायबाप हर पावे ।
साक्षात भगवान हाकिं, या भजता सर्व ताप हरवावे ।
प्रभूभक्‍त प्रभूरुप स्पष्ट म्हणुनि एकनाथ हा भावे ।
स्तविला भक्‍त मयुरें किं येणे सर्व इष्ट लाभावे ॥
याहुनी अति अधिकोत्तर एकोपंतचि मनासी आवडला ।
जपलो बहुतां परि मी सेवाधर्म न समग्र सांपडला ॥
ऐसी द्वादश वर्षे सेवा करि हरि अति आनंदाने ।
दाखविले नाथाला जे सुख ते पाहिले न नंदाने ॥
श्रीनाथ घरी पाणी द्वादश वर्षे भरीच कंसारी ।
त्या वंशासी भजावे सार्थक हे मुख्य सौख्य संसारी ॥

You can donate to the bank account given below

Name of Account Holder- Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan

Current Account No - 00000036694177969
Bank Name - State Bank Of India
IFSC Code - SBIN0003796
Branch - Bhaji Market, Paithan

Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Rights Reserved.
Designed & Developed By : Xposure infotech Pvt. Ltd.

Return and Refund
Privacy Policy
Cancellation Policy